Ad will apear here
Next
नाना पाटेकर यांच्या आवाजात ऐका गणपतीची आरती
मुंबई : नाना पाटेकर यांचे गणपतीबाप्पावरील  प्रेम आणि भक्ती सर्वश्रुत आहे. त्यांची गणपतीवर दृढ श्रध्दा असून, दरवर्षी ते आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. त्यासाठी सुंदर सजावट करतात. साग्रसंगीत पूजाअर्चा, आरती यांनी त्यांचे घर गजबजून गेलेले असते. यंदा आता नाना पाटेकर तुमचाही गणेशोत्सव अविस्मरणीय करणार आहेत. स्टार प्लस वाहिनीवरील ‘अद्भूत गणेशोत्सव’  या कार्यक्रमात नाना पाटेकर आपल्या दमदार गणपतीची आरती, तसेच श्लोकस्तवन करणार आहेत.

दहा ते चौदा  सप्टेंबरदरम्यान ‘स्टार प्लस’ वाहिनीवर भव्य सेट, नामवंत लोकांची भेट यांचा समावेश असलेला ‘अद्भूत गणेशोत्सव’  साजरा होणार आहे. या कार्यक्रमात आजवर टीव्हीवरील कार्यक्रमात कधीच न दिसलेले नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVYBS
Similar Posts
राकेश बापट घडवतोय स्वहस्ते बाप्पाची मूर्ती मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट गेले महिनाभर गणपतीबाप्पाच्या तयारीत मग्न आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तो बाप्पाची मूर्ती स्वहस्ते तयार करत आहे. या वेळी तो नेमकी कुठली मूर्ती साकारतोय, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
कलाकारांच्या घरचा गणेशोत्सव गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी सगळे जण सज्ज झाले आहेत. घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र एक आगळा उत्साह आहे. चैतन्यमय वातारवण निर्माण झाले आहे. कलाकार मंडळीही बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. त्यांच्या घरचा गणेशोत्सव कसा साजरा होतो, ते यंदा तो कसा साजरा करणार आहेत, त्यांनी काय तयारी केली आहे, याविषयी जाणून घेऊ या त्यांच्याचकडून
गणेशोत्सवासाठी परदेशी पर्यटकांकरता गिरगाव चौपाटीवर विशेष सुविधा मुंबई : परदेशी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दिमाखदार गणेशोत्सवाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे खास व्यवस्था करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language